Marathi


परख

वर्षोनुवर्षे मी
हृदयाच्या भिंतीवर
हातोडा मारत होतो,
आज अखेरीस ती फुटली
आणि मला कळले
की हृदयाच्या आतला मी
आणि तो हातोडा मारणारा मी
हे एकच आहोत
कायमच …

(इयान बॉयडेन यांच्या “Assay” ह्या कवितेचे मुक्त भाषांतरण)

—Ian Boyden
Translator: Amit Phansalkar